पितृ (पितर ) दोष म्हणजे काय ? उपाय व उपासना

पितृ दोष म्हणले कि आपणास अनेक प्रकारे घाबरून सोडले जाते . पण त्यास न घाबरता सहज व सोप्पे उपाय केल्यास नक्कीच आपल्या जीवनात समृद्धी येऊ शकते.

पितृ कार्य किंवा पितरांस पाणी का देणे कारण आपल्या घराण्यास कुठलेही पितृ दोष असतील किंवा पितृ दोष लागू नये म्हणून पितृ कार्य पितृ पंधरवड्यात करावे. पितृ तर आपलेच असतात पण त्याचे दोष आपणास कसे लागतील पण आपण त्याचे कार्य योग्य प्रकाराने केल्यास त्यास उत्तम गती प्राप्त होते व आपल्या घराण्यावर त्यांचे आशीर्वाद असतात प्राचीन ज्योतिष ग्रंथाप्रमाणे पितृदोष सर्वात मोठा दोष मानला गेला आहे. यापासून पीडित व्यक्तीचं जीवन कष्टदायक असतं. ज्याच्या कुंडलीत हा दोष असतो त्याला पैश्याचा अभाव असतो आणि त्याला मानसिक ताणाला सामोरे जावं लागतं. साधारणात: पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. बरेच सोप्पे विना खर्च उपाय व उपासना आहेत त्या द्वारे पितृ दोष दूर केले जाऊ शकतात . त्या करिता खर्चीक त्रिपिंडी किंवा कुठल्याही प्रकारची शांती करण्याची आवश्यक्त। नसते. कोणीही खार्चिक उपाय पेक्षा स्वतः रोज विना खर्च उपाय व उपासना केल्या जाऊ शकतात याचा विचार करणे

श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे, गो ग्रास गायीला देणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. या ऋणातून मुक्त होण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे स्मरण करावे

उपाय व उपासना

 • कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाइकांचा फोटो लावून त्यावर हार घालावा आणि प्रार्थना करावी.
 • पितृ पक्ष सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही पितरांना जल अर्पण करा. या पाण्यात जव आणि काळे तीळा सोबत एक लाल फूलही अर्पण करावे . हे जल दक्षिण दिशेला तोंड करून दुपारच्या सुमारास अर्पण केले पाहिजे. यामुळे केवल पित्तरे प्रसन्न होत नाहीत तर यामुळे पितृदोष कमी होतात.
 • जर तुम्हाला पितरांच्या मृत्यू तिथीबाबत माहिती नसेल तर तुम्ही पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध घाला. या दिवशी श्राद्ध घातल्यास तुम्ही पितृ दोषातून मुक्ती मिळवू शकता.
 • ओम अर्यमा नमः या मंत्राचा जप करणे . ।।ॐ अर्यमा न त्रिप्य्ताम इदं तिलोदकं तस्मै स्वधा नमः।...ॐ मृत्योर्मा अमृतं गमय।।
 • पितृ पक्षात कावळे आणि मुग्यांना रोज खाणे दिले पाहिजे. पितृ पक्षात आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात धरतीवर येतात.
 • ऊँ यमाय नम:, ऊँ धर्मराजाय नम:, ऊँ मृत्यवे नम:, ऊँ अन्तकाय नम:, ऊँ वैवस्वताय नम:, ऊँ कालाय नम:, ऊँ सर्वभूतक्षयाय नम:, ऊँ औदुम्बराय नम:, ऊँ दध्राय नम:, ऊँ नीलाय नम:, ऊँ परमेष्ठिने नम:, ऊँ वृकोदराय नम:, ऊँ चित्राय नम:, ऊँ चित्रगुप्ताय नम:।। या सर्वांचे उचारण करून पितृ तिथीला अंगठ्याच्या बाजूने पाणी देणे .
 • या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकता . ओम सर्व पितृदेवता भ्यो नमः . ओम पितृ नारायणाय य नमः
 • पिंपळाच्या झाडापुढे तिळाच्या तेलाचा दिवा लावणे . पिंपळाच्या झाडाला दर शनिवारी प्रदक्षिणा घालणे .
 • काय घडते पितृ दोष मुळे :-

  • घरात संतती होत नाही .
  • संतती झाली तर व्यंग निर्माण होतो .
  • संतती राहिली गर्भपात होणे .
  • घरात अशांती राहणे .
  • घरातील संपत्तीचा व्यय होणे .
  • कर्ज वाढणे .
  • घरात छोटे मोठे अपघात घडणे .
  • घरात लग्न कार्यात अडथळे येणे .
  • असे अनेक प्रकारे जीवनात अडथळे येतात . पण या पितृदोषांस घाबरून न जातात सहज व सोप्पे विना खर्च उपाय व उपासना करणे

  वर उपाय देण्यात आलेले आहेत . आपणास अजून काही माहिती हवी असल्यास आपण ऑफिसला भेट देणे किंवा खालील दिलेल्या नंबरवर कॉल करणे .

  इंडियन स्कूल ऑफ अस्ट्रोलॉजी ” आज पर्यंत ज्योतिष प्रचार व प्रसार च कार्य पुण्यात १२५ वर्षाहून अधिक काळ करत आलेली आहे . आपल्या सर्व समस्यांचे विना खर्च उपाय व उपासने साठी संपर्क करा ९८२३१९५९२५